spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खालील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करावे.

यवतमाळ, २८ –  दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे ओळख निर्माण करणारे  विनोद पत्रे यांचा मायभूमीत अत्यंत गौरवाने सत्कार करण्यात आला.
हा सत्कार  संताजी जगनाडे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यवतमाळ, विदर्भ तेली समाज महासंघ जि. यवतमाळ, अखिल तेली समाज महासंघ, नवी दिल्ली आणि संताजी सृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  बाळासाहेब मांगुळकर (आमदार, यवतमाळ विधानसभा मतदारसंघ),  संतोषभाऊ ढवळे (संपर्क प्रमुख, शिवसेना – बाळासाहेब ठाकरे गट),  लिलाधरजी वाघमारे (अभियंता, समृद्धी महामार्ग – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ), मा. सुनिता विलास काळे (राष्ट्रीय महिला अध्यक्ष, अखिल तेली समाज महासंघ) आणि   अनिलभाऊ जिपकाटे (जिल्हाध्यक्ष, अखिल तेली समाज महासंघ) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या मान्यवरांच्या हस्ते  विनोद पत्रे यांचा शाल, श्रीफळ आणि संताजी महाराजांच्या मूर्तीचे स्मृतिचिन्ह प्रदान करून भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.
सत्कार स्वीकारताना विनोद पत्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले,
“सत्कार आयुष्यात बरेच झाले, परंतु मायभूमीत – आपल्या समाजबांधवांच्या उपस्थितीत झालेला हा सत्कार माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. हा सन्मान माझ्या पुढील कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल.”
यावेळी त्यांनी ज्ञानेश्वरी रायमल तथा विलासजी काळे यांचे विशेष आभार मानले, ज्यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि सततच्या प्रेरणेमुळे हा गौरवपूर्ण सोहळा शक्य झाला, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधव, पत्रकार, आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून उत्साह वाढविला.

Popular Articles