नागपूर २९ : नागपूरची कन्या दिव्या देशमुख हिने जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत विश्व विजेतेपद मिळवून नागपूरचे, महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या अथक परिश्रमाचे, सातत्याचे आणि जिद्दीचे हे फलित आहे. बालपणापासूनच तिने दाखवलेली प्रतिभा आणि आज मिळवलेले यश हे संपूर्ण तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या अद्भुत यशाबद्दल मी तिचे, तिच्या पालकांचे आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. भविष्यातही ती असाच पराक्रम करत राहो, अशा शुभेच्छा!
– संदीप जोशी, आमदार








