कामठी :- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कामठी-मौदा विधानसभा युवक काँग्रेसतर्फे सर कस्तुरचंद डागा बाल सदन, कामठी येथे वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब, महाराष्ट्र प्रभारी अजय चिक्कारा, सहप्रभारी नवजोत सिंह संधू, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनुराग भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी कामठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक धीरज यादव, काँग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक काशीनाथ प्रधान, ज्येष्ठ काँग्रेसी कृष्णा यादव, माजी जिल्हा परिषद सदस्या सरिता रंगारी, माजी उपाध्यक्ष अहफाज अहमद, माजी नगरसेवक मुश्ताक अहमद,माजी नगरसेवक नीरज लोणारे, राजेश बनसिंघे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कामठी-मौदा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सलामत अली यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.







