spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

AK Club तर्फे व्हॉइस ऑफ विदर्भ एकल गायन स्पर्धेचे आयोजन २८ जूनला

नागपूर :- संगीतप्रेमी आणि गायन क्षेत्रातील नवोदित तसेच अनुभवी कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एके क्लबतर्फे ‘व्हॉइस ऑफ विदर्भ’ एकल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, २८ जून रोजी सकाळी ९.३० वाजता. विदर्भ साहित्य संघ, सीताबर्डी येथे होणार आहे. स्पर्धेत १८ ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष व महिला स्पर्धक सहभागी होऊ शकतील. विजेत्यांना आकर्षक चषक, रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच ६१ ते ८५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठीही विशेष सन्मान व बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेची ऑडिशन फेरीही २८ जून रोजी याच ठिकाणी होणार असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Popular Articles