spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नशामुक्त सप्ताहांतर्गत पथनाट्याद्वारे जनजागृती; योग दिनी व्यसनमुक्तीची शपथ

यवतमाळ :- केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत १७ ते २६ जूनदरम्यान देशभर “नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान” या संकल्पनेवर आधारित नशामुक्त सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांच्या अनुषंगाने २० जून रोजी नेहरू स्टेडियम येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने व्यसनमुक्तीविषयक विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी जोगडेकर यांनी सहकाऱ्यांसह सादर केलेल्या प्रभावी पथनाट्यातून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, तसेच व्यसनामुळे कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या विपरीत परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आंतरराष्ट्रीय योग दिनी व्यसनमुक्तीची शपथ

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने पोलीस कवायत मैदान येथे व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करत शपथ घेतली.

या कार्यक्रमास जिल्हा समाज कल्याण अधिकारी मंगला मुन यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नशामुक्त सप्ताहाच्या माध्यमातून समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करून निरोगी व सशक्त समाज घडविण्याचा संदेश देण्यात आला.

Popular Articles