spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गोबरवाही पोलिसांची अवैध हातभट्टीवर धाड; १.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,भंडारा गोबरवाही :- गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत कारली आणि चिखला परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी १ लाख ९४ हजार रुपयांचा अवैध हातभट्टीचा मुद्देमाल जप्त केला. पहिल्या कारवाईत कारली येथील उमेश देवाजी गजाम (३६) याच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचा ५५० किलो सडवा मोहाफूल साठा जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत चिखला सितेकसार कालव्याच्या बोडीकाठावरून मानिक कचरु रॉबरे (५०) याच्याकडून ८४ हजार रुपये किमतीचे ४०० किलो मोहाफूल आणि ४ प्लास्टिक ड्रम हस्तगत करण्यात आले. या दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र

दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) अन्वये गुन्हे (अ.क्र. ३३३/२०२६ व ३३४/२०२६) नोंदवण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पो.नि. शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पो.हवा. बान्ते आणि पो.हवा. मते यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.