spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रमानगर आरओबी पुलियावरील लखलखत्या विद्युत रोषणाईने वेधले नागरिकांचे लक्ष; शहराच्या सौंदर्यात भर

कामठी :- शहराच्या विकासाला आणि सौंदर्यीकरणाला नवी झळाळी देणाऱ्या रमानगर येथील रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) पुलियावर आकर्षक विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात आली आहे. या लखलखत्या प्रकाशमय व्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर उजळून निघत असून पुलाचे रूपडे अधिकच देखणे आणि आकर्षक बनले आहे.

पुलावर बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रकाशयोजनेमुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना अधिक सुरक्षितता आणि स्पष्टता मिळत आहे. तसेच या आकर्षक रोषणाईमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक जण सायंकाळच्या वेळी पुलावरील प्रकाशझोत अनुभवण्यासाठी येथे भेट देत आहेत.

स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अशा विकासकामांमुळे कामठी शहराला आधुनिक ओळख मिळत असल्याची भावना व्यक्त केली. रमानगर आरओबी पुलियावरील ही लखलखती रोषणाई सध्या शहरातील चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरली आहे.

Popular Articles