spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘एमआयडीसी’ हद्दीतील सदनिकांच्या पुनर्विकासाबाबत  मुंबईतील आमदारांची बैठक घेणार – मंत्री उदय सामंत

मुंबई :- एमआयडीसी हद्दीतील सदनिकांच्या पुनर्विकासासंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी मुंबईतील सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी चर्चेत सदस्य प्रसाद लाड, अभिजीत वंजारी, अमित गोरखे आदींनी सहभाग घेतला.

मंत्री सामंत म्हणाले की, एमआयडीसी क्षेत्रातील पुनर्विकासासंदर्भात सीडीसीपीआर-२०२३ मध्ये आवश्यक ते बदल आधीच करण्यात आले आहेत. या बदलांमुळे पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळेल, प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरतील आणि रहिवाशांना सुरक्षित व आधुनिक घरे उपलब्ध होतील. एमआयडीसी क्षेत्रातील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी तसेच प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरण्यासाठी आवश्यक बदल करण्यात आले आहे. एफएसआय वाढवून सदनिकांची संख्या वाढविण्याची मागणीही मान्य होणार आहे. यामुळे पुनर्विकास प्रक्रियेला चालना मिळेल.

पुनर्विकासाच्या प्रस्तावांना अधिकारी स्तरावर कोणताही अनावश्यक अडथळा निर्माण होत असल्यास त्याची माहिती लोकप्रतिनिधींनी शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. अशा प्रकरणांमध्ये आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

Popular Articles