– पाच जुगारी रंगेहाथ जाळ्यात
करडी/पालोरा :- करडी पोलिसांनी किसनपूर रोडलगत सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकीसह एकूण ८७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करडी ते किसनपूर जाणाऱ्या सिमेंट रोडच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये काही इसम मोठ्या प्रमाणावर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती बिट अंमलदार कुंभरे आणि शिपाई मेश्राम यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करून पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला आणि अचानक धाड टाकली. यावेळी झुडपांच्या आडोशाला जुगार खेळणारे पाच जण पोलिसांच्या हाती लागले.
या कारवाईत विजय कुमन तितीरमारे (३०, रा.आंबेडकर वार्ड, करडी), संजय सोविदा बरयेकर (४०, रा. चांपा, तिरोडा), रामपुरी भागवत धरीया (३८, रा. गोसवारी, सिल्ली), नामदेव कोंडीराम सेलोकर (४०, रा. करडी) आणि महेंद्र नारायण उके (३०, रा. करडी) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम, दोन महागडे मोबाईल आणि एक दुचाकी, असा एकूण ८७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.




