spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार आणि उद्योजक मेळावा यशस्वीरित्या संपन्न

गडचिरोली :- नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नियोक्ता / उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उददेशाने त्यानुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर गडचिरोली, व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने 20 जून 2026 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलापल्ली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला.

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास एकुण 295 पेक्षा अधिक उमेदवारांनी आणि एकुण 4 उद्योजकांनी प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग नोंदविलेला असून त्यांच्याकडील विविध रिक्त पदांबददल उमेदवारांना माहिती दिली. त्यामध्ये Llyods Metal And Energy Limited, Shri Balaji Automobiles and Servicing Center Gadchiroli, V R Enterprises, Chandrapur व Solar Industries, Nagpur या नामांकित उद्योजकांनी रोजगार मेळाकरीता सहभाग घेतलेला असून त्यांनी अनेक विविध क्षेत्रातील रिक्त पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी उद्योजकामार्फत उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यांत आल्या. त्यामध्ये एकुण 86 पेक्षा अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यांत आलेली आहे. व उर्वरित उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करत रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अशी माहिती सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी दिली आहे.

Popular Articles