spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डुमरी उडाण पुलावर भीषण अपघात

– उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दोन मित्रांचा मृत्यु. 

कन्हान :- पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ डुमरी उडाण पुलावर शुक्रवारी (दि.२६ जुन) ला रात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन मित्रांचा जागीच मृत्यु झाला. पुलावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

प्राप्त माहितीनुसार ओमप्रकाश यशवंत बावणे वय ३९ वर्ष रा. संताजी नगर वार्ड क्र. ६, व त्यांचा मित्र रोहित लालसिंग सोयाम वय २७ वर्ष, राह. घनशौर जि. शिवनी मध्यप्रदेश हे दुचाकी क्र. एम एच ४० सी पी ०१५९ ने कन्हान वरून आमडी फाट्या कडे जात होते. रात्री ११.३० वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ च्या डुमरी स्टेशन उडाण पुलावर उभा असलेल्या यूपी ५३ ईटी ९४०५ क्रमांकाच्या वीसचाकी ट्रकला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. अप घाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना उपचारासाठी कामठी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघां नाही मृत घोषित केले. मृतक ओम प्रकाश बावणे यांचे मोठे बंधु ज्ञानेश्वर यशवंत बावणे यांनी कन्हान पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीत वीस चाकी ट्रक चालकाने पुलावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा इशारा न देता ट्रक उभा केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप केला आहे. संबंधित ट्रक चालकाविरुद्ध कठोर कायदे शीर कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.

अपघातातील मृतक ओमप्रकाश यशवंत बावणे यास आई, वडील, तीन भाऊ व पत्नी आणि लहान एक मुलगा एक मुलगी आहे. मृतक रोहित सोयाम हा पुण्याला ट्रक्सी चालवित असुन दोन दिवसा अगोदर कन्हान येथिल मित्राला भेटण्यास आला होता. आणि आज शुक्रवार (दि.२६) सायंकाळी पुण्याला जाणार होता. परंतु ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात काळाने त्यास त्याच्या मित्रासह कायमचे घेऊन गेले.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असुन या डुमरी स्टेशन चौकातील हॉयमॉस लाईट व पुलावरील लॉईट बरेच दिवसापासुन बंद असल्याने रात्री येथे अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे हे लॉईट सुरू करण्याची तसेच पुलांवर आणि महामार्गांवर उभे राहणाऱ्या वाहन चालकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याची मागणी नागरिकांकडुन होत आहे.

Popular Articles