कामठी :- तालुक्यातील भोवरी ग्रामपंचायत येथे राज्याचे महसूल व नागपूर -अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थानिक निधीतून दोन कोटी रुपये मंजूर निधीतून घोगसनाला खोलीकरण, दफनभूमी ,पांदण रस्ता बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले भोवरी ग्रामपंचायतचे सरपंच ऋषी भेंडे यांचे हस्ते पूजा ,अर्चना करून घोगस नाला खोलीकरण, अद्यावत दफनभूमी ,व पांदण रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान, विशेष अतिथी म्हणून योगेश डाफ, आनंद पेटकर ,पोलीस पाटील गणेश नाकतोडे ,प्रसन्नजीत पानतावणे, रमेश सांबारे ,जनार्दन चांभारे ,रवींद्र कोंगे, सुरेश इंगळे, उपसरपंच देविदास नागतोडे, ग्रामपंचायत सदस्य रेखा पानतावणे ,कृष्णा करडभाजणे ,ओमहरी कोंगे ,कोमल सांबारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामदास नागतोडे, प्रसन्नजीत पानतावणे ग्राम उपस्थित होते ,कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी आतिशकुमार देशभरतार यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.








