spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सांसद संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी , बहुजन एकता पत्रकार संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

हंसराज भंडारा :- पत्रकारांशी कथितरित्या अपमानास्पद वर्तन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बहुजन एकता पत्रकार संघाने केली आहे. यासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, राज्याचे गृहमंत्री तसेच संबंधित पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, अलीकडेच एका घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांशी खासदार संजय दिना पाटील यांनी कथितरित्या अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वर्तन केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराचा बहुजन एकता पत्रकार संघाने तीव्र निषेध नोंदवत पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हटले आहे.

पत्रकार हे शासन आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा असून जनहिताचे प्रश्न निर्भयपणे मांडणे हे त्यांचे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावण्याच्या घटना लोकशाहीसाठी घातक असल्याचे संघाने नमूद केले आहे.

खासदारांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित वक्तव्यांची व धमकीची सखोल चौकशी करून तातडीने कायदेशीर कारवाई करावी, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत तसेच पत्रकारांना कर्तव्य बजावताना सुरक्षा व सन्मान मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या प्रकरणात योग्य कारवाई न झाल्यास पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही संघाने दिला आहे.

निवेदन सादर करताना बहुजन एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष सय्यद जाफरी, उपाध्यक्ष मनोहर मेश्राम, सचिव दिलीप देशमुख, सहसचिव अनमोल मेश्राम, कोषाध्यक्ष शैलेश हुमणे, हंसराज रामटेके, धम्मपाल बौद्ध, सुरेश निंबार्ते, जुनेद सय्यद, , हर्षल वाघमारे, सचिन मेश्राम व राजेश उके उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.