किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इंदोरा येथे मंगळवार (ता. 30 जून)ला शाळा प्रवेशोत्सव, नवगतांचे स्वागत,गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांचे म्हणजेच नवगतांचे बैलबंडीतून मिरवणूक काढून त्यांचे औक्षण करून, पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.

आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेवर विश्वास ठेवा ,आज या शाळेमधून गुणवत्ता पूर्ण शिक्षण ,मोफत पाठ्यपुस्तक ,अनुभवी शिक्षक तसेच विविध उपक्रम घेतले जात आहे, असे याप्रसंगी मार्गदर्शन करताना सरपंच नेकसिंह गहेरवार यांनी सांगितले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य सरपंच नेकसिंह गहेरवार ,उपसरपंच नकुलसिंह लोनिया, स्वरूप गहेरवार, पालक वर्ग आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.




