नागपूर :- बारईपुरा येथील अण्णाभाऊ साठे समाज भवनात विवेक विचार मंचाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २५ जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमात बारईपुरा व लालगंज परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक विचार मंचाचे मुख्य संयोजक सुनील कीटकरू होते.
प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र खडसे, चंदु हेडाऊ, माजी उपसरपंच कैलास पोटफोडे तसेच सामाजिक कार्यकर्ते आकाश ठाकूर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देत मेहनत, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे आयोजन राजू साळवे यांनी केले. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक, समाजबांधव, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण पार पडला.




