spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली बीट अधिकारी व अंमलदारांची बैठक

 

नागपुर ३० : दिनांक २९/०७/२०२५ रोजी मा. हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रमीण जिल्हा यांनी पोलीस अधिक्षक कार्यालय नागपुर ग्रामीण येथे पोलीस स्टेशन अंतर्गत बीट मध्ये नेमलेल्या अधिकारी आणि अंमलदार यांची बैठक घेवुन त्यांच्या कामकाजांचा आढावा केला. मा. पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रमीण जिल्हा यांची अवैध धंदयावर करडी नजर असुन त्यांनी बिट अधिकारी आणि अंमलदार यांना आपआपल्या बीट मध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई अवैध

करण्याचे आदेश दिले तसेच अवैध दारू, अवैध रेती तस्करी आणि अवैध अंमली पदार्था बाबत कारवाईचा प्रत्येक बीट अधिकारी आणि अंमलदार यांचा वैयक्तिक आढावा घेण्यात आला. सदर बैठकीत मा. पोलीस अधिक्षकांनी चांगले कामगिरी करणारे आधिकारी आणि अंमलदार यांना बक्षीस जाहीर केले तसेच कामगिरी न करणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना शिक्षा सुध्दा करण्यात आली आहे.

Popular Articles