spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर–सावनेर–खापा मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी; गडकरी, बावनकुळे, डॉ. राजीव पोतदार व आमदार आशिष देशमुख यांना निवेदन

खापा, वार्ताहर :- नागपूर–सावनेर–खापा या मार्गावर मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत नगर परिषद खापाचे अध्यक्ष पियुष राजेंद्र बुरडे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषद सदस्य डॉ. राजीव पोतदार तसेच आमदार आशिष देशमुख यांना निवेदन सादर केले.

सादर निवेदनात नागपूर–सावनेर–खापा या मार्गावर दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी व व्यापारी प्रवास करत असल्याने वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.

तसेच या मार्गाचा व्यवहार्यता अहवाल (Feasibility Study) करून भविष्यातील मेट्रो विस्तार योजनेत नागपूर–सावनेर–खापा मार्गाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. मेट्रो सेवा सुरू झाल्यास नागरिकांना जलद, सुरक्षित व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच सावनेर–खापा परिसराच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि व्यापारी विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी नगर परिषद खापाचे उपाध्यक्ष सुनील पाहुणे तसेच नगरसेवक मुन्ना शर्मा उपस्थित होते.

Popular Articles