spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धामणगाव येथे कठडेअभावी उघडयावर, डॉक्टर अभावी कंपाउंडरच करतो कृत्रिम रेतन व जनावरांवर उपचार 

किशोर साहू: मौदा, ता. ३१: आजनगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ अंतर्गत येत असलेल्या धामणगाव येथे आज बुधवार (दि. 30 जुलै) ला कठडेअभावी उघड्यावर, डॉक्टर अभावी कंपाउंडरच जनावरंवर कृत्रिम वेतन व उपचार करताना दिसले, तर जनावरांचे मालक व त्यांचे घरचे सदस्य कंपाउंडर, शिपाई चे काम करताना ,साहित्य घरूनच आणताना व साहित्याची जुळवाजुळव करताना दिसले. याबाबत कंपाउंडर भगत यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, येथील कठडा मागील अनेक वर्षापासून तुटलेला असून, ज्या जनावरांवर उपचार करायचे आहे, त्याच्या मालक स्वतःच घरून दोर आणतो व त्यांच्या घरचे सदस्य उपचार करेपर्यंत मदत करतात. येथील डॉ. रहांगडाले यांना मलेरिया झाला असून ते रजेवर असल्याने सोमवारला येणार आहेत.

Popular Articles