यवतमाळ, ३१ : दै. यवतमाळ मार्मिकचे जिल्हा प्रतिनिधी आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे ओळख निर्माण करणारे सतीश बाळबुधे यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार संताजी जगनाडे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यवतमाळ, विदर्भ तेली समाज महासंघ जि. यवतमाळ, अखिल तेली समाज महासंघ, नवी दिल्ली आणि संताजी सृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब मांगुळकर, संतोष ढवळे, लिलाधर वाघमारे, सुनिता विलास काळे, अनिल जिपकाटे, विलास काळे, ज्ञानेश्वर रायमल यांची प्रमुख उपस्थिती होती.या मान्यवरांच्या हस्ते सतीश बाळबुधे यांचा शाल, श्रीफळ आणि संताजी महाराजांच्या मूर्तीचे स्मृतिचिन्ह प्रदान करून भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर रायमल तथा विलास काळे यांचे विशेष आभार मानले,
पत्रकार सतीश बाळबुधे यांचा सत्कार









