यवतमाळ, ३१ – युवाराष्ट्र दर्शनचे जिल्हा प्रतिनिधी आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे ओळख निर्माण करणारे संजय सावरकर यांचा सत्कार करण्यात आला.हा सत्कार श्री संताजी जगनाडे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यवतमाळ, विदर्भ तेली समाज महासंघ जि. यवतमाळ, अखिल तेली समाज महासंघ, नवी दिल्ली आणि संताजी सृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब मांगुळकर, संतोष ढवळे, लिलाधर वाघमारे, सुनिता विलास काळे, अनिल जिपकाटे, विलास काळे, ज्ञानेश्वर रायमल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मान्यवरांच्या हस्ते संजय सावरकर यांचा शाल, श्रीफळ आणि संताजी महाराजांच्या मूर्तीचे स्मृतिचिन्ह प्रदान करून भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर रायमल तथा विलास काळे यांचे विशेष आभार मानले, ज्यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि सततच्या प्रेरणेमुळे हा गौरवपूर्ण सोहळा शक्य झाला, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधव, पत्रकार, आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित होती. तसेच या सत्कारादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला.
पत्रकार संजय सावरकर यांचा सत्कार









