यवतमाळ, दि. ३१ : राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिपॅटायटीस या आजाराबद्दल समाजामध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी दरवर्षी दि.२८ जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त जनजागृती रॅली व कारागृहात कावळीची तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावर्षासाठी Hepatitis Let’s break it down हे हिपॅटायटीस दिनाचे घोषवाक्य जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिध्द केलेले आहे. हिपॅटायटीस दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, नेत्र चिकित्सा अधिकारी डॅा.मनोज तगडपल्लेवारव जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रिती दुधे, वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वाती शेंडे, शासकीय नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य अनिता राठोड यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली होती. यामध्ये शासकीय नर्सींग स्कूलमधिल प्रशिक्षणार्थी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम जिल्हा कारागृह यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी २६ कैद्यांची कावळीची तपासणी करण्यात आली. तसेच वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे काविळचे लसीकरण शिबिर घेण्यात आले.




