spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रामपंचायत नरसाळा येथे समाधान दिवस साजरा 

किशोर साहू: मौदा, ता. ३१: जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्या आदेशानुसार गावातील नागरिकांच्या समस्या गाव पातळीवर सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या बुधवारला जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये समाधान दिवसाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार आज जुलै महिन्याच्या पाचवा बुधवार (दि.३० जुलै) ला गट ग्राम पंचायत कार्यालय नरसाळा येथे समाधान दिवस आयोजित करण्यात आला.
 या गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नरसाळा, सिंगोरी, कुंभापूर, कोपरा या चार गावातील आलेल्या समस्याग्रस्त नागरिकांचे समाधान करण्यात आले. याप्रसंगी ग्राम महसूल अधिकारी मृणाली फळणीकर, मंडळ अधिकारी नृपराज पर्वते, कृषी सहाय्यक भारत काकडे,सरपंच अजाब टेकाम , ग्राम सेवक श्रद्धा सपाटे, महसूल व ग्रामपंचायत कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Popular Articles