spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त कामठी बसस्थानक परिसरात वृक्षारोपण

कामठी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार, १४ जुलै रोजी कामठी बसस्थानक परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात एसटी विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली.

‘हरित भविष्यासाठी एक पाऊल पुढे’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारीही उपस्थितांनी स्वीकारली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला कामठी नगर परिषदेचे सभापती दिलीप बांडेबुचे, माजी नगराध्यक्ष प्रमोद (गुड्डू) मानवटकर, माजी नगरसेवक सिद्धार्थ रंगारी, शेख सज्जाक, देवानंद कांबळे,चेतन नायडू तसेच एसटी विभागाचे पंकज जुमले (सहायक वाहतूक अधीक्षक, इमामवाडा आगार), रितेश बागडे (वाहतूक नियंत्रक), रोशन खुरगे (वाहतूक नियंत्रक), रोहित टाकभवरे (रा.प. कर्मचारी) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. “एक नागरिक – एक वृक्ष” हा संकल्प प्रत्येकाने स्वीकारून लावलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या हरित उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.

Popular Articles