नागपूर :- नेहरूनगर झोन सभापती सीमा ढोमणे यांनी शुक्रवारी(ता.१७) झोन कार्यालयात सर्व अधिकारी कर्मचारी यांची आढावा सभा घेतली. सभेला नगरसेवक विजय झलके, प्रविण गिऱ्हे, शकील पटेल, निलेश गायधने, नगरसेविका दिव्या धुरडे, तसनीम परबीन नियामत खान ताजी, रजनी वानखेडे, शारदा बारई, वर्षा डोंगरे यांच्यासह सहायक आयुक्त विकास रायबोले, आसलकर,नायक तसेच प्रभागातील सर्व स्वच्छाता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
सभेत पाणी समस्या, रस्त्यावरील खड्डे, नाले सफाई, धुर फवारणी, पाण्याचे वाढीव बिल, पावसाळा पूर्व तयारी, कचरा समस्या, चोकेज समस्या यावर चर्चा करून सभापती ढोमणे यांनी झोन मध्ये चोकेज गाडया, मडपंपाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. तसेच झोन मध्ये प्रभाग २६ , २७, २८, 29 आणि ३० साठी सोमवार २० ते २८ जुलै दरम्यान सकाळी ८ ते १२ वाजता दरम्यान एसआयआर शिबीर घेण्याचे नियोजित केले.








