spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील बहुतांश लाभार्थी मानधनापासून वंचित

– वेबसाइट बंद असल्याने रखडली प्रक्रिया

कामठी :- कामठी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि दिव्यांग निराधार योजनेतील बहुतांश लाभार्थ्यांचे एप्रिल महिन्यापासून मानधन प्रलंबित असल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) अनिवार्य केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी वापरण्यात येणारी वेबसाइट बंद असल्याने प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. परिणामी अनेक पात्र लाभार्थ्यांचे मानधन रखडले आहे.

दरम्यान, काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मानधन जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी मोठ्या संख्येने लाभार्थी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. याबाबत नायब तहसीलदार सारिका धात्रक यांनी शासनाच्या सूचनांनुसार वेबसाइट सुरू होताच प्रलंबित कागदपत्रे अपलोड करून प्रश्न लवकरात लवकर निकाली काढला जाईल, असे सांगितले आहे.

शासनाने वेबसाइट आणि तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून रखडलेले मानधन वितरित करावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

Popular Articles