spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

करवीर सोलुशन तर्फे संस्थेच्या 17 वा स्थापना दिनानिमित्त वृक्षारोपण

नागपूर :- ज्ञान विज्ञान पब्लिक चारिटेबल ट्रस्ट अंतर्गत करवीर सोलुशन तर्फे संस्थेच्या 17 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थे तर्फे उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेतर्फे फळांचे पौधांचे रोपण करण्यात आले. अध्यक्ष छाया वझलवार यांनी सांगितले की नागपूर शहरात स्वच्छ हवे साठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. पुढच्या पिढीला याची आवश्यकता भासणार आहे. शहराला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी महापौरांनी सुद्धा आवाहन केले आहे. या प्रसंगी सविता मंगलगिरी, जगजीत पदम, माधवी सुपसांडे, संजीवनी चौधरी, ज्योती धमोरीकर, पूजा किर्नलकर, झुम्मा जाधव, अर्चना पटवर्धन आणि इतर उपस्थित होत्या.

Popular Articles