spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मिशन बहुजनचे धरणे आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नागपूर :- NEET पेपर लीक, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मिशन बहुजन, नागपूरच्या वतीने जाहीर समर्थन देण्यात आले. यासोबतच लडाखचे प्रख्यात पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दर्शवत शनिवारी राजे शिवाजी चौक, हिवरी नगर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा आणि पेपर लीकसाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली.

आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबतही तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. भारत सरकारने त्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन संवादाच्या माध्यमातून त्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मिशन बहुजनच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET पेपर लीक प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच NEETसह सर्व पेपर लीक प्रकरणांची केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात राहुल मोरे, राकेश धारगावे, मनोज गजभिये, सत्यवान मेश्राम, विनोद गजभिये, चंद्रमणी नाईक, जयदीप चिवंडे, महेंद्र कठाने, दीपा डोंगरे, उज्वला डोंगरे, ममता कांबळे, नंदा डोंगरे, पुष्पा वासनिक, भारती सहारे, दुर्गा नाईक, उषा इंगळे, माया उमंक, सुनीता लोखंडे, कल्याणी शेंडे, निशा शेंडे, मनोज मेश्राम, प्रतिमा जांबुले, सुमित झोडे, छाया नाईक, सुनिता भोईर, मनीषा गवई, साधना धुनिवन, कविता गवई, प्रकाश राहुल, दिपक रंगारी, अरविंद रंगारी, ईश्वर रजक, दिलीप रामटेके, पुंडलिक नाईक, डॉ.बी.सी.रंगारी, यू.के. मानवटकर, ओमप्रकाश सोमकुवर, सुरेंद्र नागदेवते, सतीश देशपांडे, राजेंद्र गोंडाने, ममता गोंडाने, मृणाली गोंडाने, सुरेश ए.पाटील, बी.बी.शोभले व बी. कांभळे यांच्यासह मिशन बहुजनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles