– अध्यक्ष कुंदा विजयकर, यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
उमेश भेलकर, मोहपा :- स्थानिक बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) पथकाच्या वतीने ‘वृक्ष लागवड संकल्प अभियान’ अंतर्गत ‘एक पेड़ माँ के नाम’ या उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्ष कुंदाताई विजयकर, यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मोहप्याचे नगराध्यक्ष माधव चर्जन आणि उपनगराध्यक्ष प्रमोद तपासे, गजानन भिंगारे, माजी सरपंच, तेलगाव कामठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरात पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त अशा अनेक देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अलका थोडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद वडते, डॉ. विनोद भालेराव, डॉ. लीलाधर खरपुरिये, डॉ. संजय ठवळे, प्रा. पवन उमक, प्रा. सिद्धार्थ चनकापुरे, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. अनिता श्रोते, प्रा. शुभम वाघ, तसेच कल्पना देवळे, अजय अंजनकर, रजनी गणोरकर, प्रदीप बगडे, अरविंद डहाट आणि प्रकाश कोकोडे यांच्यासह महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली. ‘एक पेड़ माँ के नाम’ या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्येकाने वृक्ष लागवड व संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.




