हिंगणघाट :- सहयोग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, नागपूरद्वारे संचालित बुद्धिस्ट मंगल परिणय ग्रुप, नागपूर यांच्या वतीने हिंगणघाट शहरात राज्यस्तरीय भव्य-दिव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, दि. २६ जुलै रोजी, दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत न्यू यशवंत नगर, मास्टर कॉलनी येथील रिठे भवन, हिंगणघाट येथे संपन्न होणार आहे. समाजातील विवाहयोग्य युवक- युवतींना योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे वधू-वर व त्यांच्या पालकांना एकाच ठिकाणी परिचय करून घेण्याची संधी उपलब्ध होणार असून, समाजात सुसंवाद व सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होण्यास मदत होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विक्रांत भगत, सामाजिक कार्यकर्ते ईश्वरदास कुंभारे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मून, पत्रकार दिनेश घरडे तसेच संयोजक नरेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या उपक्रमाचे आयोजन प्रमोद सोमकुंवर व उमाकांत सोमकुवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, विवाह इच्छुक युवक- युवती, त्यांचे पालक व समाज बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
(अधिक माहितीसाठी प्रमोद सोमकुंवर – ९३७३६-१७११४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.)



