विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने बैल दगावला…

0
30

हिंगणा :- शेतातील विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने शॉक लागून बैलाचा जागीच तडफडून मृत्यू झाला. ही घटना आज (२०)सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास खैरी( पन्नासे)शिवारात घडली. खैरी येथील शेतकरी मुरलीधर पिसे यांच्या शेतातील विहिरीकडे जाणाऱ्या वीज वितरण कंपनी च्या विद्युत खांबात अचानक विजेचा प्रवाह आल्याने याच शेतात त्यांनी चरायला सोडलेल्या एका बैलाचा त्या खांबाला स्पर्श झाला. पाऊस आल्यामुळे जमीन सुद्धा ओली होती. त्यामुळे बैलाला विजेचा शॉक लागला आणि त्याचा मृत्यू झाला. शेतकरी मुरलीधर यांच्या लक्षात येताच त्यांनी इतर जनावरे बाजूला केली. याची माहिती वीज वितरण कंपनी च्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. मागच्या वर्षी शेतकऱ्याने दोन लाख रुपयांची ही बैल जोडी खरेदी केली होती. त्यातील एक बैल दगावल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीच्या कामाला सुरुवात झाल्याने त्यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे. या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील सरपंच शेखर पिसे व शेतकऱ्यांनी केली आहे.