spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सईदनगर रेल्वे पटरीजवळ आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सईदनगर परिसरात रेल्वे पटरीजवळ काल अंदाजे एका 30 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सईदनगर रेल्वे पटरीवरील पोल क्रमांक 111/17 ते 111/19 दरम्यान हा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचांसमक्ष पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे पाठविण्यात आला.

मृत व्यक्तीचे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नसून त्याचे वय अंदाजे 30 वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू चे प्रकरण नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास नवीन कामठी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Popular Articles