spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पात्र लाभार्थीनीं प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा- मुख्याधिकारी विनोद जाधव यांचे आवाहन

PMAY अंतर्गत प्रभाग 15 मधे शिबिराचे आयोजन

कामठी १  – प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थी ला घरकुल देने हा  शासनाचा धोरणात्मक निर्णय असून पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवनियुक्त मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी केले.
ते प्रभाग 15 आनंद नगर समाज भवनात नगर परिषद द्वारा आयोजित शिबिरात बोलत होते.
महसूल मंत्री आणि नागपुर जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ड्रिम प्रोजेक्ट अंतर्गत कामठी शहरातील प्रत्येक पात्र नागरिकाला घरकुल द्यायचे आहे, असे माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी सांगितले. या वेळी पालकमंत्री कार्यालयाचे गौरव देऊळकर, भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले, विक्की बोंबले, अरविंद चवडे, दिनेश खेडकर, शंकर चवरे,उमेश जगणे, रोहित दहाट, अभिलाश यादव,विक्की वाहने आणि नगर परिषद अभियंता विरेन्द्र ढोके, प्रधानमंत्री आवास योजना अधिकारी सय्यद फैसल, अहमद सरफराज, कर्मचारी अमन घोड़ेस्वार, निलेश वानखेड़े प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीते साठी बालकदास सिंगाड़े, रोहित मेश्राम,आशिष रामटेके, अनिकेत चाटे,दिपक नगरकर,पुष्पदास नागदेवे, प्रज्वल सौलंकी,प्रशांत विश्वकर्मा,हितेश तिरपुड़े, बिरजु चहांदे, सुनिल हजारे, संजय रॉय,अजित सोनकुसरे यांनी सहकार्य केले.

Popular Articles