spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यां साठी केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन

– शेतकरी विकास मंच व्दारे तहसिलदार आणि कृषी अधिकारी पारशिवनी मार्फ निवेदन

कन्हान :- विदर्भातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजजी चव्हाण यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात राज्यातील कर्जमाफीची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांना न मिळाल्याचा, धान बोनस प्रलंबित असल्याचा तसेच आग लागुन पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

निवेदनानुसार विदर्भात पावसाअभावी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असुन भात, तूर, कापु स आदी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्य ता निर्माण झाली आहे. याशिवाय कर्जमाफीची रक्कम बँकांपर्यंत न पोहोचल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यास अडचणी येत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच नागपुर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यात आग लागुन गहु पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चार महिन्यांनंतरही आर्थिक मदत मिळालेली नसल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. राज्य सरकारने पुन्हा १ रू. पीक विमा योजना सुरू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, धान बोनस व कर्जमाफीची रक्कम तत्काळ वितरित करावी, अशी मागणी सुरेश वाघचौरे तहसिलदार पारशिवनी आणि राकेश वसु तालुका कृषी अधिकारी पारशिवनी यांच्या मार्फत निवेदन शिवराज चव्हाण, कृषी मंत्री भारत सरकार, नवी दिल्ली हयाना पाठवुन शेतकरी विकास मंच व्दारे भगवानदास यादव, शांताराम जळते, राजु गुरधे, सुरेश मेश्राम, विशाधर कांबळे, गणेश कांबळे, बळीराम सातपैसे, रामकृष्ण हुड, प्रविण सतदेवे, निर्मला मरकाम, सुनीता कांबळे आदि सह शेतक-यांनी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.