spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

…… अखेर तारसा येथील कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात वाहतूक बंद होण्याची समस्या सुटली,नवीन बांधकाम केलेल्या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू

– तारसा – धामणगाव जि प क्षेत्रातील भाजपचे जि प चे भावी उमेदवार व माजी सरपंच आनंद लेंडे यांच्या सतत पाठपुराव्याला यश

किशोर साहू, मौदा :- तीन दिवसांपूर्वी सुरू असलेल्या सततधार पावसाने तारसा येथील जुन्या कमी उंचीच्या पुलावरून सांड नदीचे पाणी वाहायला सुरुवात झाली होती, मात्र यंदापासून तारसा येथील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहू लागताच मागील अनेक वर्षापासूनची वाहतूक बंद होण्याची समस्या नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने व त्यावरून आठ दिवसापूर्वीच वाहतूक सुरू झाल्याने अखेर बंद झालेली आहे.

तारसा येथून वाहणाऱ्या सांड नदीवर कमी उंचीच्या पुलाऐवजी मोठ्या नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी नऊ वर्षापूर्वीपासून तारसा – धामणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील भाजपचे जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार तारसा ग्रामपंचायत चे माजी सरपंच आनंद लेंडे हे चार वर्षांपूर्वी सरपंच असताना व आता चार वर्षापासून त्यांची पत्नी तारसा ग्रामपंचायत सरपंचा वैशाली आनंद लेंडे उपसरपंच चंद्रशेखर गभने,समस्त ग्रामपंचायत सदस्यगण यांनी महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे लेखी ठराव देऊन, सतत पाठपुरावा केल्याने मोठ्या पुलाचे बांधकाम मंजूर होऊन,काम पूर्ण होऊन वाहतूकही सुरू झाली असल्याने तारसा व परिसरातील नागरिकांनी तारसा – धामणगाव जि प क्षेत्रातील भाजपचे जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार व माजी सरपंच आनंद लेंडे,मंत्री बावनकुळे व मंत्री जयस्वाल यांचे आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.