spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘रक्तात आहे राष्ट्रभक्ती, शुभेच्छा देऊ रक्तदानातून, चला विक्रमी मतदान करूया’अशा घोषणा देत निमखेडा येथे भाजपाच्या 66 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

किशोर साहू, मौदा :- चाचेर मंडळ अंतर्गत येत असलेल्या निमखेडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या वाढदिवस महोत्सवानिमित्त निमखेडा येथे नागपूर रामदास पेठ येथील धीरज खरवडे यांची लाईफ लाईन ब्लड बँक रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कडून नुकतेच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी’ रक्तात आहे राष्ट्रभक्ती, शुभेच्छा देऊ रक्तदानातून, चला विक्रमी रक्तदान करूया’ अशा घोषणा देत 66 भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदानाने मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी भाजपा मौदा तालुका चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण, पंचायत समिती माजी उपसभापती खेमराज चाफले, किसान आघाडी महामंत्री तथा सरपंच संकेत झाडे, माजी सरपंच आनंद लेंडे, महामंत्री चांगदेव येळणे, अशोक बावनकुळे, मंगेश चाफले, सुरेश भिलकर, उमेश शेंडे, आकेश पानतावणे, सिन्नु बुरूपपल्ली, लीलाधर घाटबांधे, महेंद्र दोरखंडे, प्रल्हाद रंधई ,कमलेश महादुले, रंजीत येळणे, सुरेश येळणे, दिनेश भुजाडे, कल्पना घाटबांधे, नेहा शेंडे उपस्थित राहून रक्तदानाने मुख्यमंत्री फडणवीस यांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या.

Popular Articles