spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इनर व्हील क्लब ऑफ नागपूरतर्फे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

नागपूर :- इनर व्हील क्लब ऑफ नागपूर आणि लेट कमलताई दवंडे स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (KDS) यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमातून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्लबच्या अध्यक्षा डॉ. पूजा साओजी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. पीडीसी मीना कुलकर्णी यांनी आषाढी एकादशीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व अत्यंत प्रभावीपणे सांगत विद्यार्थी व शिक्षकांना श्रद्धा, शिस्त, भक्ती आणि संस्कारांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग, श्लोक आणि समूहगीताने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शिक्षकांना तुळशीची रोपे भेट देण्यात आली व प्रत्येकाने निसर्गसंवर्धनासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी काळू यांनी केले, तर आयएसओ अंशू शुक्ला यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सीसी डॉ. मीनल दवंडे, अर्चना मराठे, लक्ष्मी झा,  नीता पुनियानी आणि साधना पाटकी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य मोलाचे ठरले.

भारतीय संस्कृती, मूल्यशिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडविणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

Popular Articles