spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पूर्णब्रह्म अभियानांतर्गत बुटीबोरी येथील वृद्धाश्रमांना अन्नधान्याचे गुप्तदान

नागपूर :- ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूरच्या ‘पूर्णब्रह्म अभियान’ या सामाजिक उपक्रमांतर्गत बुटीबोरी येथील दोन वृद्धाश्रमांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे गुप्तदान करण्यात आले. “कोणीही उपाशी झोपू नये” या उदात्त भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश गरजू, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे हा आहे. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर आणि अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. प्रतिष्ठानचे सचिव राजू मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपक्रमाचे अध्यक्ष सुरेश उरकुडे यांच्या प्रोत्साहनाने अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवीदास आगरकर यांनी साथ फाउंडेशनद्वारे संचालित वृद्धाश्रम, बुटीबोरी तसेच स्वर्गीय भैय्याजी गुर्जर पुनर्जन्म आश्रम, बुटीबोरी येथे संचालक प्रयाग डोंगरे यांच्या माध्यमातून अन्नधान्याचे गुप्तदान केले. या उपक्रमात प्रकाश ढोले, रामेश्वर कांबळे, गोपाल सोरते, विनोद हिरुरकर, अरुण कोहाड, रामकृष्ण बांगडे, मोहन धवल, मंदिर समिती, विजय लांजेवार, रासेकर, ज्योती नागपूरकर, राम चव्हाण, लहूकर आदींसह अनेक सभासदांनी अन्नधान्य व इतर आवश्यक साहित्याचे योगदान दिले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निंबाळकर, डॉ. राजेश कुऱ्हाडे, वसंतराव इझनकर, रमेश जिल्हारे, विलास वाकडे, भोयर तसेच सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Popular Articles