spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

समाजसेवक साक्षोधन कडबे आदर्श शिक्षक पुरस्कारांनी सम्मानित

 

सचिन चौरसिया, रामटेक २ :– सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्व. श्यामराव गिरोलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२५ सोहळा गुरुवार (दि.३१) जुलैला सावंगी मेघे येथे संपन्न झाला.
असोसिएशन ऑफ नॅशनल ॲग्रिकल्चरल जर्नालिस्ट (अनाज इंडिया) व राष्ट्रीय कृषि पत्रकार संघातर्फे आकाशझेप फाउंडेशन रामटेकचे संस्थापक सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक, समाजसेवक साक्षोधन कडबे यांना स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यावेळी बोलत स्व. श्यामराव गिरोलकर गुरुजींनी केलेल्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा करत त्यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. सत्काराला उत्तर देताना साक्षोधन कडबे यांनी “आजन्म देशाची व देशातील लोकांची सेवा करत राहणार” असल्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष  ठाकरे (से.नि. शिक्षण विस्तार अधिकारी), प्रमुख पाहुणे किशोरराव रणनवरे, चंद्रशेखर शिंदे व मातोश्री सुशीलाबाई गिरोलकर, चंद्रकांत वैद्य, साधना पवार, गंगाधर थोरात, रमेश भोयर व विजयराव टापरे, गजानन गिरोलकर (अध्यक्ष, राष्ट्रीय कृषि पत्रकार संघ), सचिन माळकर (सचिव, राष्ट्रीय कृषि पत्रकार संघ), पूजा मोहोरकर (जिल्हाध्यक्षा, राष्ट्रीय कृषि पत्रकार संघ), रमेश भोयर  कुलकर्णी महाराज, अमोल शिर्के आदी उपस्थित होते. राजूभाऊ गिरोलकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Popular Articles