spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वनोजा स्मशानभूमीला रस्ता कधी मिळणार?

 

अहो साहेब हाच का विकास? 
यवतमाळ, संजय कारवटकर २ : राळेगाव तालुक्यातील वनोजा येथील स्मशानभूमीला रस्ता नसल्यामुळे,अंत्यसंस्कारासाठी जाताना मृतदेह आणि कुटुंबीयांना खूप त्रास सहन करावा लागत आहे,प्रेत हे नाला ओलांडून चिखल तुडवत न्यावे लागत आहे. जर नाल्याला पावसाळ्यात पुर असला तर प्रेत ण्यायचे कशे? हा प्रश्न वनोजावाशीयाना पडला आहे, अहो साहेब हाच का तुम्हाचा विकास अशी जनता बोलतानी दिसत आहे,गेल्या तीन वर्षांआधी नवीन स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले आहे तरी अजून पर्यंत स्मशानभूमीला रस्ता नाही,वनोजा आणि उंदरी रस्त्याला लागून नवीन स्मशानभूमी असून उंदरी रस्ता हा रहदारीचा मार्ग आहे तसेच शेतकऱ्यांचा पांदन रस्ता असून शेतकऱ्यांना सुद्धा चिखलाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी स्मशानभूमीला रस्ता मिळावा, यासाठी ग्रामस्थ अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत,रस्ता नसल्यामुळे, स्मशानभूमीपर्यंत पोहोचणे नागरिकांसाठी खूपच गैरसोयीचे आणि वेदनादायी ठरते,लोकप्रतिननीधी फक्त माईक हातात घेऊन जनतेला सागतात कि आम्ही विकास केला,मात्र आमाला साधे रस्ताने सुध्या चालता येत नाही,तरी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

Popular Articles