spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिवसेना ओबीसी विभागाच्या पूर्व विदर्भातील लोकसभा संघटकांची नियुक्ती जाहीर 

– पूर्व विदर्भात शिवसेनेची ताकत वाढणार: प्रवीण कळंबे

नागपूर :- शिवसेना ओबीसी विभागाच्या पूर्व विदर्भातील विविध लोकसभा मतदारसंघांसाठी संघटक पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिप्रेत ठेवून तसेच शिवसेना प्रमुख नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याची माहिती शिवसेना ओबीसी विभागाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रवीण डी. कळंबे यांनी दिली आहे. पक्ष सक्षम करण्यासाठी आणि पूर्व विदर्भात ओबीसी विभागाचे कार्य प्रभावीपणे विस्तारण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांवर संबंधित लोकसभा मतदारसंघात संघटन बळकट करणे, पक्षाच्या धोरणांचा प्रसार करणे, कार्यकर्त्यांशी समन्वय राखणे तसेच जनसंपर्क वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये विलास डोंगे यांची चंद्रपूर लोकसभा संघटक, प्रभाकर तडस यांची वर्धा लोकसभा संघटक, नरेंद्र कंद्रीकरवार यांची गडचिरोली-चिमूर लोकसभा संघटक, तर अमोल तांडुळकर यांची रामटेक लोकसभा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेना ओबीसी विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास प्रवीण कळंबे यांनी व्यक्त केला आहे तसेच पूर्व विदर्भातील ओबीसी समाज आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहीती दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.