spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गुरुपौर्णिमेनिमित्त एच. एस. महात्मे संस्कार विहार शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

नागपूर :- एच.एस. महात्मे संस्कार विहार शाळा, नागपूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी २८ जुलै ला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृतीतील गुरू- शिष्य परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी आर्या साठे हिने सुमधुर ईशस्तवनाने केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरूंच्या महत्त्वावर मनोगते व्यक्त करत गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन दिशा बोर्डे यांनी तर  दिपाली गुप्ता यांनी आभार मानले.

यावेळी विद्यार्थ्यांनी गुरूंचे जीवनातील स्थान, संस्कारांचे महत्त्व आणि भारतीय परंपरेतील गुरू-शिष्य नात्याचे मूल्य प्रभावीपणे उलगडून सांगितले. सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या संचालिका रजनी काळमेघ यांनी दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीतील गुरू-शिष्य परंपरे बद्दलची जाणीव अधिक दृढ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Popular Articles