हंसराज,भंडारा :- राज्यमंत्री (गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म) तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्हा नियोजन समिती (DPDC) बैठकीस उपस्थित राहणार असून, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास भेट देणार आहेत. दौऱ्यानुसार सकाळी १०.०० वाजता ते नागपूर येथून शासकीय वाहनाने भंडाऱ्याकडे प्रस्थान करतील. सकाळी ११.०० वाजता भंडारा येथे आगमनानंतर हेमंत सेलिब्रेशन हॉल, रॉयल पब्लिक स्कूलजवळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते सहभागी होतील. त्यानंतर दुपारी २.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समिती (DPDC) बैठकीस ते उपस्थित राहून जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेतील. बैठकीनंतर सायंकाळी ५.०० वाजता ते शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रस्थान करतील.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उद्या जिल्हा दौऱ्यावर


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




