नागपूर :- जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी, नागपूर जिल्हा शिक्षण संस्था मंडळ, नागपूर जिल्हा मुख्याध्यापक संघ या सर्व संघटनाचे माजी अध्यक्ष,माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जीवनविकास एज्युकेशन सोसायटी, सिरसपेठ नागपूर चे संस्थापक कार्याध्यक्ष शिक्षणमहर्षी यांचा दि. २१/०७/२०२६ ला वयाच्या ८८ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांचे राजकीय, सामाजिक, व शैक्षणिक क्षेत्रात भरपूर योगदान होते. त्यांनी ग्रामीण व शहरी भागातील मागास भागात गरीब, कामगार, शेतकरी, शेतमजूर यांचे मुलामुलींना शिक्षण घेता यावे यासाठी त्या भागात शाळा काढून शिक्षणाची केजी टू पीजी पर्यंतची सोय करून दिली.शेकडो गरजू लोकांना संस्थेत नोकरी देऊन त्यांचे जीवनमान उंचावले. अशा या कर्तृत्वान यशस्वी महान व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा रविवारी २ आगष्टला, माजी खासदार व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्य अध्यक्ष रामदास तडस यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला प्रामुख्याने माजी मंत्री, प्रदेश काँग्रेसचे माजी प्रांताध्यक्ष रणजित देशमुख, माजीमंत्री सर्वश्री विनोद गुढधे पाटील, अनिल देशमुख, राजेंद्र मूलक, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, ॲड अभिजीत वंजारी, मुंबईचं माजी शिक्षक आमदार कपिल पाटील,माजी आमदार सुधाकर कोहळे, देवराव रडके, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता अतुल लोंढे, शिक्षण संस्था चालक मंडळाचे सरचिटणीस रवींद्र फडणवीस, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, शिक्षकभारतीचे राज्य महासचिव अतुल देशमुख, अध्यक्ष अशोक बेलसरे आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. व स्व बाबुरावजी झाडे यांचे कार्याबद्दल गौरव उदगार काढले. सभेचे प्रास्ताविक संयोजक बळवंत मोरघडे, तर संचालन देवेंद्र काळबांडे यांनी तर आभार डॉ. देवमन कामडी यांनी मांडलेत. याप्रसंगी त्यांची मुले शिक्षकभारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, प्रविण झाडे, नितीन झाडे, नातू मोहनीश, दुष्यंत, रोहन, साहिल झाडे, नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक, प्राचार्य उपस्थित होते. या सभेचे यशस्वीतेसाठी विलास गभने, किशोर वरभे, ज्योती गुलहाने, माधुरी झाडे, धनश्री झाडे, भारती झाडे चंद्रभान मेहर,मुकेश मोहर्ले, विजय पाठक, बबन मंडाळे, कुशल धोतकर आदिनी परिश्रम घेतलेत








