spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन, पाच वर्षाच्या मुलापासून वृद्धांपर्यंत स्पर्धेत सहभाग

ग्रामीण भागात बुद्धिबळाचा प्रचार व प्रसार मुख्य उद्देश

खापा, २ :  चेस असोसिएशन नागपूर यांच्या मार्गदर्शनात, तालुका चेस असोसिएशन सावनेर यांच्या सहकार्याने “फर्स्ट खापा ओपन वन डे रॅपिड चेस टुर्नामेंट 2025” ब्रिलियंट चेस अकॅडमी, पॉवर चेस अकॅडमी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तान्या सेलिब्रेशन लॉन खापा येथे रविवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली. बुद्धीबळ बद्दल जागरूकता, ग्रामीण भागात प्रसार प्रचार, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी, बुद्धीबळ बद्दल ग्रामीण भागात आवड निर्माण करून ग्रामीण भागातील मुलांना याबाबत अवगत करणे. असा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. असे आयोजक निलेश चन्नावार, दीपक चौव्हाण यांनी सांगितले.

नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, वर्धा, रामटेक, गोंदिया, तुमसर, नांदेड, बुटीबोरी, खापरखेडा, कोराडी, वाठोडा, डुंबरी, करंभाड, तसेच राज्यातून विविध शहरांमधून आणि परिसरातील या खुल्या प्रवर्गातील स्पर्धेत पाच वर्षापासून ते अंशी वर्षापर्यंतच्या एकूण 226 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेकरिता एकूण सहा राऊंडकरिता 105 चेस बोर्ड खेळाडूंसाठी लावण्यात आले होते.

या स्पर्धेत एकूण आठ फेऱ्या झाल्या असून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने आखलेल्या नियमावलीनुसार ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नागपूर येथील राष्ट्रीय पंच श्रीकांत बागडे यांनी मुख्य पंचांची भूमिका पार पाडली, तर नागपूर येथील राष्ट्रीय पंच गायत्री पाणबुडे, आकाश रेवतकर, निनाद जैन, प्रयास अंबाडे, अनंता सिरस्कार अकोला हे सहाय्यक पंच असून कार्यरत होते. ही बुद्धिबळ स्पर्धा मुली मुले, महिला पुरुष अशा स्वतंत्र वयोगटात आयोजित केली आहे. या स्पर्धेत प्रत्येक डावासाठी बुद्धिबळ घड्याळांचा वापर अनिवार्य असून प्रत्येकी दहा मिनिटे पाच सेकंद व प्रत्येक चालीसाठी पाच सेकंदाची वाढीव वेळ निर्धारित करण्यात आली होती.

“स्पर्धेचे विजेता”
चेतन देवधगडे यांना प्रथम पारितोषिक पाच हजार, चषक आणि पदक, रुद्र महेंद्र ढोले द्वितीय पारितोषिक तिन हजार,चषक आणि पदक, अर्णव अभय कुमार मून तृतीय पारितोषिक दोन हजार, चषक आणि पदक, सर्वोत्तम व्हर्टन प्रवर्गातून प्रथम संजय गुहा, द्वितीय प्रताप येरपुडे, तृतीय दत्तात्रय वैद्य, चतुर्थ संजय भांगे, पाचवा गौतम मेश्राम, तसेच भाग घेणाऱ्या 70 चषक (ट्रॉफी), 80 पदक (मेडल), सर्व स्पर्धांना चेस नोटेशन बुक देऊन सन्मानित करत उत्साह वाढविण्यात आला.

7 वर्षाखालील मुली वयोगटातून प्रथम आहि मेश्राम, द्वितीय अदिती कोहाडे, तृतीय सान्वी मेश्राम, मुले वयोगटातून प्रथम अद्विक सुखदेव, द्वितीय ध्रुव दासवानी, तृतीय ओजस झांझल,
9 वर्षाखालील मुली वयोगटातून मानवी कळसकर, द्वितीय राची फुलझेले, तृतीय इशिका चौबे, मुले वयोगटातून प्रथम शौर्य कोरडे, द्वितीय रुद्र दखाने, तृतीय गांधी देव,
11 वर्षाखालील वयोगटातून मुली स्वरा गांधी, द्वितीय जीविका रामटेके, तृतीय अण्विका घोडेस्वार, मुले वयोगटातून प्रथम अरहम रजा, द्वितीय विहान वालदे, तृतीय आर्यांश जाभुळकर,
13 वर्षाखालील मुली वयोगटातून प्रथम रीतुल जैन, द्वितीय दुर्वा लाबडे, तृतीय सिद्धी बगडीया, मुले वयोगटातून प्रथम आरव काळे, द्वितीय विहान देशमुख, तृतीय यश दामोधर,
15 वर्षाखालील मुली वयोगटातून प्रथम वृतिका गेमे, द्वितीय निलय कामडी, तृतीय पुर्वई पडोळे, मुले वयोगटातून प्रथम वल्लभ भाके, द्वितीय प्रशिक चौधरी, तृतीय अंशूल उके,
जेष्ठ पुरुष प्रवर्गातून वीरेंद्र बिसेन, निसर्ग नारनवरे, महिला प्रवर्गातून तनिष्का भारद्वाज, सनाया शेलकर, तसेच 55 ते 60 वर्षीय 12 वरिष्ठ खेळाडू, खुल्या प्रवर्गात 16 ते 80 वर्षांवरील खेळाडूंनी सहभाग घेतला.

बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजक तथा बुद्धीबळ राष्ट्रीय प्रशिक्षक निलेश चन्नावार नागपूर, संचालक आंतरराष्ट्रीय पंच दीपक चौव्हाण यांनी काम पाहिले. संचालन व आभार प्रदर्शन दीपक चौव्हाण यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून सालई (मोकासा) येथील सरपंच नंदाताई शेंदरे, रामटेक येथील वरिष्ठ प्रशिक्षक भुषण कारेमोरे, किशोर शेंदरे, वरिष्ठ खेळाडू अंजर खान, सामाजिक कार्यकर्ता मकसूद शेख, मुकेश पावडे, आकाश सेरेवार, सागर सेरेवार, दिनेश चौरेवार इत्यादी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले

Popular Articles