spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ताजबाग परिसरातून चोरीस गेलेली ई-रिक्षा पोलिसांच्या चतुराईने हस्तगत – एक आरोपी अटकेत, दुसऱ्याचा शोध सुरू

 

नागपूर ४  – सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा ताजबाग परिसरातून चोरीस गेलेली ई-रिक्षा (क्र. MH49CF0032) अवघ्या काही तासांत शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात हफिज खान हमिद खान (वय ४५) या इसमाला अटक करण्यात आली असून, त्याचा साथीदार नाना (पूर्ण नाव अज्ञात) अद्याप फरार आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रात्रपाळी तपास पथकासह वाठोडा परिसरातील सिम्बॉयसिस कॉलेजजवळील वस्तीत छापा टाकण्यात आला.

छाप्यामध्ये आरोपी हफिज खान हा त्याच्या घरात सापडला. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, आपल्या साथीदार नानाच्या मदतीने त्यांनी ई-रिक्षा इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने तुकडे करून ते घराशेजारी असलेल्या पाण्याच्या गड्ड्यात फेकून लपवले होते.

सदर चोरीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, आरोपीविरुद्ध कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार बनकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त (परि. ४)  रश्मिता राव, सहाय्यक पोलीस आयुक्त  नरेंद्र हिवरे, तसेच सक्करदरा वपोनि एम. एम. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पीएसआय प्रविण वाकळे, पोहवा ज्ञानेश्वर , धमेन्द्र , बाळु , राजेश , सपोउपनि भिमराव आणि चालक पोशि आशिष यांचा सक्रिय सहभाग होता.

Popular Articles