गडचिरोली :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, सेना भरती कार्यालय, नागपूर, व Lloyds Metals & Energy Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरती मार्गदर्शन मेळावा हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 10 ऑगस्ट 2026 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत यशस्वीरित्या पुर्ण केले आहे.
अग्निवीर भरती ही भारतीय सैन्याने सन 2022 पासून सुरू केलेली नवीन भरती प्रक्रिया असून, या योजनेचा मुख्य उद्देश देशातील युवक-युवतींना भारतीय सैन्यात सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता.

त्यानुषंगाने खालीलप्रमाणे सत्राचे आयोजन करण्यांत आले होते. व त्यामध्ये , एकुण 419 उमेदवार उपस्थित होते.
सदर अग्निवीर भरती मार्गदर्शन मेळाव्यांमध्ये भारतीय सैन्याच्या लेफ्टनंट कर्नल, सेना भरती कार्यालय, नागपूर यांच्यामार्फत अग्निवीर भरती प्रक्रिया, पात्रता निकष, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, सेवाकाल, वेतन, सेवा निधी (Seva Nidhi), तसेच सेवेनंतर उपलब्ध होणाऱ्या विविध संधी व इतर सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त यांनी दिली आहे.








