– स्वातंत्र्यदिना निमित्त ६७ रक्तदात्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान
कन्हान :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन भूमीपुत्र बहुउद्देशीय संस्था, कन्हानच्या वतीने तारसा चौक महाकाली कॉम्प्लेक्स येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल ६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
भव्य शिबीरात कांद्री नगरपंचायत नगरसेविका शुभांगी पवन कुंभलकर आणि आर्मी क्लब अध्यक्ष पवन कुंभलकर या पत्नी व पती जोडयानी रक्तदान करून नागरिकांसमोर प्रेरणादायी आदर्श प्रस्थापित केला. तसेच ग्रामिण पत्रकार संघ कन्हान चे सचिव सुनिल सरोदे हयांनी सुध्दा रक्तदान केले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी कन्हान नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे होते. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच माजी मंत्री सुनील केदार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक सक्षम नागरिकाने नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमाला एम.जी.एस. संविधानि क हक्क संघटन, शिवराय ग्रुप खंडाळा (घ), दि. रामटेक महिला अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, राजे फाउंडेशन कन्हान, अपोलो अकॅडमी कन्हान, नगरधन, शिवाजी नगर मित्र परिवार व आर्मी क्लब संघटना यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वितेकरिता संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर उर्फ चिंटु वाकुडकर, उपाध्यक्ष समशेर पुरवले, भरत चकोले व हरिश तिडके, सचिव रजनीश मेश्राम यांचे सह अशोक नारनवरे, अनिकेत नानोटे, सुनील लक्षणे, मृणाल सरोजकर, श्रीकृष्णा माकडे, सुमेध नितनवरे, जगन कारेमोरे, अजय रंगारी, दीपक कुंभलकर, राजु चोपकर, राधेश्याम राऊत, करण पाली, सचिन कटरे, योगेश शेंडे, तुलसी पाली, सूरज कारंडे, भरत फरकाडे आणि विजय भालेराव यांनी परिश्रम घेतले. हे रक्तदान शिबिर डागा स्मृती शासकीय स्त्री प्रसुती रुग्णालय, नागपुर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. गर जु रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदाना बाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.








