नागपूर ५ : मातृ सेवा संघ महाल शाखेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने अलीकडेच उत्कृष्ट परिचारिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून पुरूशोत्तम बोरकर व अध्यक्ष ईरावती दाणी यांची उपस्थित होती. प्रदीप कऱ्हाडकर यांनी दिलेल्या देणगीतून त्यांच्या मातोश्री स्व. मनोरमा कऱ्हाडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनींना हा पुरस्कार दिला जातो.
गुणवंत विदयार्थीनींना प्रमुख वक्ता पुरूशोत्तम बोरकर व अध्यक्ष ईरावती दाणी व डाॅ. अंकिता कोठे यांच्या हस्ते प्रथम वर्ष पुरस्कार प्रिया धापोडकर व निकीता सराटकर तसेच व्दितीय वर्ष पुरुस्कार सिमरन उईके व प्राजक्ता खंडारकर यांना देण्यात आला.
2025 चा उत्कृष्ट परिचारिका पुरस्कार हा अदिती हुद्दार यांनी जाहीर केला. पाहुण्यांच्या हस्ते सिस्टर राजेश्वरी झाडगावकर यांना प्रदान करण्यात आला. सिस्टर राजेश्वरी झाडगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांचे आभार मानले. पुरोशत्तम बारेकर म्हणाले ‘रुग्णाची सार्वात जवळची व्यक्ती नर्स असते. नर्सने रुग्णांसोबत प्रेमाने बोलणे. रुग्णाला पुढील उपचाराकरिता तायार करणे. रुग्णाचे दुःख जाणून घेणे, अशी तारेवरची कसरत नर्सला करावी लागते. प्रत्येक नर्स चोवीस तास रूग्णासाठी अविरत काम करित असतात.’
कार्यक्रमच्या अध्यक्ष ईरावती दाणी यांनी विश्वास जोशी यांचे आभार मानले. नर्सेस या डाॅक्टर्स व टिचर्स यांच्या नेतृत्वाखाली काम करतात व त्या शिकत असतात. डाॅक्टर व टीचर्स जे शिकवतात ते त्यांच्या कामाचे व महत्त्वाचे असते, असे त्या म्हणाल्या. त्यांनी सिस्टर राजेश्वरी झाडगावकर व आएएनएम पुरस्कारप्राप्त विद्यार्थिनींचे अभीनंदन केले. प्रास्ताविक सदस्य जयश्री बन्सोड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. अदिती हुद्दार यांनी करून दिला. आभार सौ. जाई जोग यांनी मानले.








