spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुसळधार पावसातही नवेगावबांधमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह कायम

पंकज परशुरामकर, इनसाइडर न्युज टुडे  

नवेगावबांध :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा वर्धापन दिन नवेगावबांध येथे १५ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसातही उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ तसेच विविध संस्था व कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य स्वातंत्र्यदिन सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे, सरपंच हिराताई पंधरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय डोये, सचिन सांगोळकर तसेच मुख्याध्यापक जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, विविध शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक आणि कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच हिरा पंधरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. भागेरथीबाई आत्माराम डोंगरवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, विविध सेवा सहकारी संस्था, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, बालाजी मंदिर चौक, उमाबाई महादेवजी संग्रामे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कृषी विभाग व पशुवैद्यकीय दवाखाना येथेही ध्वजारोहण करण्यात आले.

जलसंपदा विभागात उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे, आरुषी पब्लिक स्कूलमध्ये डॉ. अभिमन कापगते, वन आगारात प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम, जवाहर नवोदय विद्यालयात प्राचार्य धारगावे, कृषी उत्पन्न बाजार समितीत उपसभापती अनिल दहिवले, नवेगावबांध पोलीस ठाण्यात ठाणेदार अजित पाटील, तर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी मार्बते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

मुसळधार पावसाच्या सरी सुरू असतानाही नागरिकांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. पावसाच्या सरी आणि भारतमातेच्या जयघोषाने नवेगावबांध परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

Popular Articles