– रिमझिम पावसातही चिमुकल्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी
नवेगावबांध :- नजीकच्या उमरी येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सार्वजनिक चौकात उमरीचे पोलीस पाटील संदीप तरोणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सावरटोला गट ग्रामपंचायतीच्या ग्राम अधिकारी रजनी शहारे, प्रशासक सरपंच युवराज तरोणे, उपसरपंच सुवर्णा तरोणे, सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. टेंभुर्णे, शिक्षक एस. व्ही. बडोले, अंगणवाडी सेविका उषा फुंडे यांच्यासह धर्मेंद्र गजबे, दुथराम राऊत, डॅनी डोये, माजी सरपंच हंसा सोनपिंपळे, भीमराव रामटेके, दिलीप मेश्राम, इंजि. पुरुषोत्तम मेश्राम, प्रकाश गुढेवार, जयदेव दांडेकर, मंजु मेश्राम, गोविंदा गुढेवार व ताराचंद गजबे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी महापुरुषांना अभिवादन करून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. रिमझिम पाऊस सुरू असतानाही उमरी येथील अंगणवाडीतील चिमुकली मुले आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश गायकवाड, महेंद्र गुढेवार, करण गायकवाड, नुकेश फुंडे, वेणेश्वर गजबे, नानू मेश्राम, दिगंबर गजबे, येशू गुढेवार व जयेंद्र गजबे यांनी सहकार्य केले. शेवटी उपस्थितांना खाऊ वाटप करण्यात आले. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.








